Thursday, September 30, 2010

विद्यापीठ बदलत आहे...

सिल्याबस पहिजे, परीक्षा फॉर्म पाहिजे, परीक्षेचे हॉलतिकीट पाहिजे. परीक्षेचे हॉलतिकीट वेळेवर मिळणे व परीक्षा देणे हि खूप महत्वाची गोष्ट आहे. मुख्यत्वेकरून याचा त्रास होतो तो फक्त बहिस्त विद्यार्थ्यांना. तर विद्यापीठाने त्यांच्यासाठी खूप चांगली सोय केली आहे. अशा अनेक मागण्यासाठी आपल्याला आपले ई-सुविधा खाते मदत करेल. बहिस्त विद्यार्थ्यांनी परीक्षेचे हॉल-टिकिट मिळविन्यासाठी आपले ई-सुविधा अकौंट कार्यान्वित करावे.


यात आपण ज्याप्रमाणे ई-मेल अकौंट काढतो त्याप्रमाणे आपली माहिती भरावयाची आहे. ती माहिती विद्यापीठात असलेल्या माहितीशी (म्हणजे आपण प्रवेश घेताना दिलेल्या माहितीशी) जर जुळली तर आपल्याला आपले नवीन पासवर्ड तयार करता येईल. मुख्यत्वेकरून लक्षात राहील असा पासवर्ड तयार करावा. जर आपल्याला आपले खाते कार्यान्वित करताना अडचण येत असेल तर आपण MKCL च्या कुठल्याही केंद्रात मदत घेऊ शकता. तेथे हे खाते काढण्यास मदत केली जाईल ते देखील मोफत. आपल्याला मिळालेला १६ अंकी PRN चा आपण वापर करू शकता तोच आपला युजर आयडी असेल.

ई-सुविधा खात्यामध्ये एवढेच नाही तर नौकरी विषयक माहिती देखील उपलब्ध आहे. त्यासाठी आपल्या लॉगीन मध्ये EASY नावाची एक लिंक उपलब्ध आहे. या लिंक चा आपण वापर करून सध्या घेत असलेल्या कोर्स नुसार आपल्याला कुठल्या नौकरीच्या संधी उपलब्ध आहेत हे आपल्याला जाणून घेता येईल.

No comments:

Post a Comment