Tuesday, November 09, 2010

EASY एक उत्तम संधी, ते देखील ई-सुविधा लॉगीन मधुन...


एमकेसीएलचा ईझी हा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी बहुपयोगी असा उपक्रम आहे. विद्यार्थ्याला केंद्रस्थानी ठेऊन या उपक्रमांतर्गत वरीलप्रमाणे शिक्षण आणि रोजगाराभिमुख माहिती easy.mkcl .org या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. या संकेतस्थळावरील नोंदणी मोफत असून, ईझीमधील सुविधा विद्यार्थ्यांना त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण ते करीअर दरम्यानच्या प्रत्येक टप्प्यावर उपयोगी पडणार आहे.

काय मिळेल ईझी वर ?

  • भारतातील ६०० पेक्षा अधिक शहरांमध्ये ३४९०० हून अधिक नौकऱ्यांचे पर्याय.
  • ३३१ स्पर्धा परीक्षांवीशयींची माहिती.
  • २५० अंतरराष्ट्रीय शिष्यवृत्या, १७० राष्ट्रीय शिष्यवृत्या आणि २६० संशोधनवृत्तीविषयक माहिती.
  • करिअरला पूरक अशा १०९ पेक्षा जास्त प्रमाणपत्रांविषयी माहिती.
  • स्वयंरोजगाराचे ७० हून अधिक पर्याय.
  • बँकांच्या ६२ शैक्षणिक कर्ज योजनांची माहिती.
  • उच्च शिक्षणातील २४३ पर्याय.
  • ४६ शैक्षणिक सरकारी योजना.